डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार - देसाई


श्रीरामपूर : शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातुन मोफत गहु व तांदूळ वितरण करण्यात येत असल्यामुळे आनंदाचा शिधाही उधारीवर द्यावा, अशी रांज्य संघटनेची मागणी शासनाने मान्य केली असुन जिल्ह्यात फक्त स्वयः घोषणापत्र घेवुन उधारीवर आनंदाचा शिधा दिला जात असल्यामुळे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पुरवठा मंत्री त्याचबरोबर  महसुल तथा पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहे.

                                    अहमदनगर जिल्ह्यातील १८८३ धान्य दुकानदारांमार्फत माहे जानेवारी २०२३ पासुन शासनाने  कार्डधारकांना मोफत गहु वा तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुकानदारांना मोफत आलेला माल मोफतच वितरीत करावा लागतो त्यातच शासनाने गुढी पाडवा व डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले परंतु दुकानदारांना मागील मोफत धान्य वितरीत केल्येल्या धान्याचे मार्जिन अद्याप मिळालेले नाही त्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचण आहे त्यामुळे आनंदाचा शिधा उधारीवर द्यावा अशी मागणी राज्य फेडरेशनच्या वतीने करण्यात आली होती त्या योग्य मागणीची  दाखल घेत शासनाने उधारीवर शिधा देण्याचे आदेश सर्व जिल्हा कार्यालयाला दिले असुन अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोच झाला असुन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी दुकानदाराकडून स्वयः घोषणापत्र भरुन उधारीवर आनंदाचा शिधा देण्याचे आदेश दिले असुन या आदेशामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे दुकानदारांना प्रथमच उधारीवर माल देण्यात आला असुन त्या बद्दल अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरवठा मंत्री नामदार रविंद्र चव्हाण महसुल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके संजय पाटील संजय देशमुख आदिचे अभिनंदन केले आहे या पत्रकावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे मंगेश छतवाणी बाबा कराड शिवाजी मोहीते कैलास बोरावके गणपतराव भांगरे  काशिनाथ अरगडे रावसाहेब भगत मुनिर देशमुख ज्ञानेश्वर वहाडणे अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे राजेंद्र थोरात विश्वासराव जाधव प्रकाश भोसले आदिंच्या सह्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post