राज खान फ्रेंड्स सर्कलच्या वतीने 'इफ्तार पार्टी'; विविध मान्यवरांची उपस्थिती


श्रीरामपूर : राज खान फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आझाद पोल्ट्री फार्म येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जोएफभाई जमादार, बहुजन भीम पँथर सेनेचे कार्याध्यक्ष अजहर भाई शेख, भीम पँथर सामाजिक संघटनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे, भीम पँथर सामाजिक संघटनेचे मुख्य सल्लागार मोहम्मदभाई शेख, सामाजिक युवा जन सेवक सोहेल शेख,भीम पँथरचे तालुका अध्यक्ष तन्वीर शेख, ऍड. हारून बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फरहान शेख, इमरान शाह, शोएब कुरेशी , सत्यम दिवटे, सोहेल शेख, नाजिम पठाण, मुजम्मील शेख, सचिन हातागळे, प्रभाकर सोळास, एकनाथ गांगुर्डे, मतीन शेख , नदीम सय्यद, साहिल शेख, विलास गांगुर्डे, तबरेज कुरेशी, सुमित जाधव, दिलावर खाटीक, अल्ताफ शेख, शब्बीर शेख, हुसेन खाटीक, आदी पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन राज खान फ्रेंड्स सर्कलचे सर्वेसर्वा राज खान, इमरान बागवान, तन्वीर सय्यद, मुजममिल सय्यद, समीर सय्यद यांनी केले. शेवटी राज खान यांनी आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post