नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या ; चेअरमन सुधीर नवले



बेलापूर ( प्रतिनिधी ) : अचानक आलेला अवकाळी पाऊस व झालेली गारपीट यामुळे या भागातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी केली आहे.

बेलापूर परिसरातील कुऱ्हे वस्ती दिघी रोड, गोखलेवाडी, खंडागळे वस्ती, गायकवाड वस्ती, परिसरास गारपीट व अवकाळी पावासाने तडाखा दिला. अचानक झालेल्या निसार्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्याचे होत्याचे नव्हते झाले आहे. या नुकसानग्रस्त भागास बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक, व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले, राजेंद्र राशिनकर, सुरेश कुऱ्हे, नरेंद्र कुऱ्हे, वैभव कुऱ्हे, शेषराव पवार, राजेंद्र लगे, भास्कर कुऱ्हे, मल्हारी लगे, आदिसह अनेकांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देवुन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी होती 'नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या'. बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संप सुरु असला तरी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील.हतबल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्याकरीता शासनाने शेतकरीपुत्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post