ग्रामीण महिलांनी आर्थिक सक्षमतेकडे लक्ष द्यावे; मंजुश्री मुरकुटे


श्रीरामपूर : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विविध गृहोद्योग सुरु करावेत. तसेच या माध्यमातून आर्थिक सक्षम व आत्मनिर्भर बनावे. महिलांना राजकीय क्षेञातही संधी असून समाजसेवेचे माध्यम म्हणून राजकारणात यावे, असे आवाहन अशोक कारखान्याच्या तज्ञ संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी केले.

तालुक्यातील टाकळीभान येथील महिलांनी माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी व्हा.चेअरमन दत्ताञय नाईक, संचालिका सौ.हिराताई साळुंके, संचालक यशवंत रणनवरे यांचे समवेत अशोक कारखान्यास भेट दिली. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना सौ.मुरकुटे बोलत होत्या.

सौ.मुरकुटे म्हणाल्या की, माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली अशोक कारखाना सक्षम बनला आहे. काळानुरुप धोरणे राबवून आणि उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, विज प्रकल्प उभारुन अशोक कारखान्याला जिल्ह्यातील नामांकीत कारखान्यांच्या नामावलीत आणले. याचबरोबर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सभासद व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्पखर्चात दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केल्याचे ते म्हणाल्या.

यावेळी सदर महिलांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन नंतर कारखाना, आसवनी व इथेनाॕल तसेच वीज प्रकल्पाची पाहणी केली. कारखान्याची प्रगती पाहून या महिलांनी माजी आ.मुरकुटे तसेच गेल्या पस्तीस वर्षातील संचालक मंडळाच्या कारभाराचे कौतुक केले.

 सदर प्रसंगी सुनिल बोडखे, भाऊसाहेब पटारे, सरपंच सौ.अर्चनाताई रणनवरे, अर्चनाताई पवार, लताताई पटारे, कालिंदीताई गायकवाड, छायाताई पटारे, मंगलाताई शिंदे, गीताताई पटारे, लिलाबाई पटारे आदिंसह टाकळीभान येथील सभासद महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post