श्रीरामपूर : नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'शिवस्वराज्य मंच'ने शिवजयंती विविध उपक्रम राबवुन साजरी केली. शिवजयंती उत्सवनिमित्त 'शिवस्वराज्य मंच'च्या वतीने आदिवासी शाळेतील मुलांना कपडे, बुट वाटप करून अन्नदान करण्यात आले.
तालुक्यातील वांगी येथील आदिवासी वस्ती शाळांना बूट, कपडे वाटप करून अन्नदान केले. याप्रसंगी 'शिवस्वराज्य मंच'चे अध्यक्ष सलमान पठाण, लक्ष्मण वडीतके, तलाठी राजेश घोरपडे, लकी शेठी, काटकर सर, संदीप शेडगे, बाळासाहेब बागुल, हनीफभाई पठाण, युसुफ शेख, अमित कुकरेजा, सिकंद तांबोली, चंदू परदेसी, दीपक आव्हाड, रोहित संगम, फैजान पठाण, स्वराज मंडलिक, आयान शेख, शोएब शेख, अफहान पठाण, विशाल मोजे, आर के खामकर, रईस शेख, दीपक आव्हाड, आकाश क्षीरसागर, कुणाल चापनेरकर, नागेश साठे, अथर्व चापानेकर, स्वप्निल पाटील, विदुर जोंधळे, आशिष वैद्य, शुभम मगर, सागर चापानेरकर, कुणाल दुबईया, ऋषिकेश शिरसागर, शुभम कोते, राजेश बोरुडे आदि उपस्थित होते.