बेलापुरात ट्रॅक केला का पोचा मारला ; अधिकाऱ्यांनी एकदा ट्रॅकवर फेरफटका मारावाच..! जागोजागी जॉगिंग ट्रॅक खचला, पेव्हिंग ब्लॉक उघडे


श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे नुकताच केलेला जॉगिंग ट्रॅक जागोजागी खचला आहे.  पेव्हिंग ब्लॉक ठिकाठिकाणी उघडे पडले आहेत. जॉगिंग ट्रॅक आहे का भ्रष्टाचाराचा ट्रॅक आहे? असा प्रश्न ट्रॅकची अवस्था पाहिल्यावर उपस्थित होतो. ट्रॅक केला का पोचा मारला, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा पाहावेच. दरम्यान, अत्यंत निकृष्ट पद्धतीने जॉगिंग ट्रॅकचे काम करून शासनाची व जनतेची लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीट म्हंटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत मळगंगा मंदिर ते संस्कृती मंगल कार्यालय दरम्यान लाखों रुपये खर्चून नुकताच जॉगिंग ट्रॅक करण्यात आला. या जॉगिंग ट्रॅकचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्याने लागलीच जागोजागी जॉगिंग ट्रॅक खचला आहे, मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उघडे पडले आहेत, फुटले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅकच्या दर्जाहीन कामाची पाहणी करावी, जेणेकरून कामात किती भ्रष्टाचार झाला आहे हे लक्षात येईल. ट्रॅकच्या कामात अतिशय निकृष्ट मटेरियल वापरण्यात आले. कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमताने जॉगिंग ट्रॅकच्या कामात मोठा अपहार केला असून असून, दर्जाहीन काम होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हंटले आहे.

साहित्त्य चाचणी केली का नाही...

जॉगिंग ट्रॅकचे काम सुरु करण्यापूर्वी कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्त्याची तपासणी होणे अनिवार्य असताना एवढे निकृष्ट मटेरियल वापरून ट्रॅकचे काम  केलेच कसे? मटेरियलची तपासणी केली का नाही? काम सुरु असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे पर्यवेक्षण केले का नाही? कोणत्या अधिकाऱ्यांनी केले? केले असेल तर ट्रॅकचे काम दर्जाहीन झालेच कसे? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केला आहे.

माहिती दर्शक फलक का नाही...

कामाच्या ठिकाणी कामाचा माहिती दर्शविणारा माहितीदर्शक फलक का लावण्यात आला नाही? काम कधी सुरु झाले? कार्यारंभ आदेश तारीख, काम पूर्ण करण्याचा कालावधी, ठेकेदाराचे नाव, काम कोणत्या विभागामार्फत केले? या माहितीचा फलक तेथे लावलेला नसताना अधिकाऱ्यांनी सदर कामाचे देयके अदा केलेच कसकाय? काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेच कसे? याचा खुलासा करून सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली.

ट्रकच्या कामात निकृष्ट मटेरियल...

जॉगिंग ट्रॅकच्या कामात वापरण्यात आलेली खडी ही अत्यंत कच्ची, ठिसूर, मुरमाड, व्हाईट स्पोटेड होती. निकृष्ट खडी, भेसळयुक्त व अत्यंत कमी डांबराचा वापर केल्यामुळे ट्रॅक जागोगाजी खचला व उखडला आहे. ट्रॅकच्या कामात साईडला दोन्ही बाजूला लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक हे निकृष्ट दर्जाचे, कच्चे असल्यामुळे जागोजागी फुटले व उघडून आले आहेत. ट्रॅकला कुठलीही लेव्हल नाही. ट्रॅकचा पैसा नेमका कोणाकोणाच्या घशात गेला? असा सवाल राजेश बोरुडे यांनी केला आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post