अहमदनगर : सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद सह इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कलेक्टर कचेरीवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय, महसूल विभाग, जिल्हा परिषद विभाग या सर्वांच्या वतीने हजारोचा मोर्चा अहमदनगर कलेक्टर कचेरीवर काढण्यात आला.
यावेळी शासनाच्या विरुद्ध आंदोलकांनी घोषणाबाजी केली जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही सरकार उपाशी कर्मचारी उपाशी अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.
याप्रसंगी शासकीय कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला. पद्धतीच्या भावना न्यूज प्रतिनिधीशी बोलताना माध्यमिक शिक्षक संघटनेचे श्री बी डी शेलार यांनी आणि शासनाला जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही इशारा दिला आहे.