श्री हरिहर केशव गोविंद महाराज यात्रा कमिटीची नुतन कार्यकारिणी जाहीर; यात्रा एक बैठका दोन


उक्कलगाव ( प्रतिनिधी ) : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या सालबादाप्रमाणे होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांची पुन्हा स्वतंत्र बैठक मंगळवारी पार पडली असून देवस्थानात झालेल्या चर्चेतून यात्रा कमिटीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नुतन यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव वामन थोरात, उपाध्यक्षपदी किशोर जगदेव थोरात, सचिवपदी दत्तात्रेय गोरक्षनाथ कर्डिले, खजिनदारपदी नंदकुमार रोहिदास थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सल्लागार कमिटीमध्ये संदिप थोरात, प्रदीप तांबे, विलास शिंदे, इंद्रजीत मुसमाडे, बापूसाहेब थोरात,अरुण गोळे, ईश्वर दरदंले,संजय जगधने मुकुंद जगधने, बाबासाहेब मोरे,भीमा रजपूत, शफिक पठाण, सतिश फुलपगार, गोविंद अंत्रे आदींचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी गावात यात्रा आनंदाने साजरी करून यात्रोत्सवाचा आंनद भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक इंद्रनाथ थोरात यांनी केले. यावेळी देवस्थानाचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रा एकच बैठका दोन...

नुकतीच एका कमिटीची देवस्थानात नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली.त्यावेळी यात्रेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. मात्र, ग्रामस्थांनी बैठकीकडे पाठ फिरवली.तेथे ग्रामस्थांचा उत्साह कमी असल्याचे पहावयास मिळाले होते.

हाऊसफुल्ल गर्दी...

ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी देवस्थानमध्ये यात्रा कमिटी व गावकऱ्यांची नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीकरिता ग्रामस्थांची हाऊसफुल्ल गर्दी झाल्याने तरुणांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post