लोकसेवा विकास महिला आघाडीच्यावतीने आज 'खेळ पैठणीचा' व महिला सन्मान सोहळा


श्रीरामपूर : लोकसेवा विकास महिला आघाडीच्यावतीने आज 'खेळ पैठणीचा' तसेच श्रीरामपूर शहरातील विविध क्षेञातील 'कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा' उत्सव  संपन्न होणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या निमंञक सौ.मंजुश्री मुरकुटे तसेच सौ.पल्लवी डावखर यांनी दिली आहे.

हा कार्यक्रम आज (दि.११) सायंकाळी ५ वाजता उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे. याप्रसंगी डॉ.सौ.सुधा कांकरिया ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहे, तर माजी आ.भानुदास मुरकुटे अध्यक्ष असणार आहेत. 'खेळ पैठणीचा' साठी तीन विजेत्यांना पैठणी, तीन उप विजेत्यांना चांदिचे करंडे व नऊ निवडक सहभागी स्पर्धकांना सोन्याच्या नथी अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय पैठणीचा लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे.

 यानिमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, उद्योजक, वैद्यकीय, कला, क्रीडा क्षेञात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी सदर प्रसंगी महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सौ.मुरकुटे, सौ.डावखर तसेच लोकसेवा विकास माहिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post