महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती व मनसे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने श्रीरामपुरातील साई विठ्ठल अनाथ आश्रम येथील मुलांना व हरेगाव फाटा येथील माऊली वृद्धाश्रम येथील लोकांना जीवनावश्यक वस्तूचे साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामध्ये गहू, तांदूळ, मीठ, साखर, तेल, डाळ, शेंगदाणा टुप, ब्रश, बिस्किट, इत्यादी रोजच्या रोज लागत असलेल्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच श्रीरामपूर रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड या ठिकाणी राहत असलेले बेसारा लोकांना दोन दिवस जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अशा अन्नदानाची उपक्रम राबून शिवजयंती व मनसे पक्षाचे वर्धापन दिन साजरा केल्याने मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आश्रमातील कृष्णा महाराजांनी व श्रीरामपुरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी मनसेच्या कामाचे कौतुक होत आहे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने शिवजयंती आंबेडकर जयंती व सर्व महापुरुषांच्या जयंती तसेच हिंदू धर्माचे सण उत्सवाला अशाच पद्धतीने समाज उपयोगी धार्मिक सांस्कृतिक व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून साजरा करत असतो म्हणून श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये मनसे पक्षाचे कार्य राहत असते व सातत्याने समाज उपयोगी काम करत असल्याने तालुक्यामध्ये मनसे पक्षाचे मोठे संघटन तयार झाले आहे यापुढील काळात देखील सतत समाज उपयोगी काम करत करून गोरगरीब लोकांची सेवा सतत करत राहू असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कुदळे उपजिल्हाध्यक्ष, तुषार बोबडे जिल्हा सचिव, डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस,गणेश दिवसे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे शहराध्यक्ष, राजू जगताप विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, विशाल लोंढे, विकी राऊत तालुका संघटक भास्कर सरोदे तालुका सचिव, निलेश सोनवणे शहर संघटक, दर्शन शर्मा शहर सचिव, प्रवीण कारले तालुका सरचिटणीस, संकेत शेलार विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष, सागर बोंडगे, संदीप विशंभर, मच्छिंद्र हिंगेमीरे, सचिन कदम, पप्पू कुरे, लखन खुरे, मारुती शिंदे, संतोष आवटी, रतन वर्मा, नितीन पवार, अतुल खरात, बाबजी शिंदे मुकेश शिंदे,नितीन खरे, सुमित चौधरी, करण नांगर, कल्पेश सूर्यवंशी, सुमित गोसावी, सागर शिंदे, संजय शिंदे, राजू शिंदे, सचिन बनसोडे, विशाल पवार, किशोर थोरात, आकाश अदीक, अक्षय काळे, रोहन गायकवाड, सचिन जाधव, ईश्वर जगताप, नितीन जोर्वेकर, कैलास देवरे, लखन कडवे, निखिल नाईक,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते