बेलापूर ( प्रतिनिधी ) येथील निर्मला रामराव नागले (वय ६६ ) या गेल्या वीस दिवसापासून बेपत्ता असून कुणाला आढळल्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे अवाहन निर्मला नागले यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
निर्मला नागले या भोळसर स्वभावाच्या आहेत. वीस दिवसापासून त्या बेपत्ता आहेत. त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, त्या आढळून न आल्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद देण्यात आली. त्यांचा रंग सावळा, उंची पाच फुट, डोक्यावरील केस पांढरे आहे. त्यांच्या अंगात निळ्या रंगाची साडी आहे. या वर्णनाची महीला कोठे आढळल्यास बेलापूर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे अवाहन नागले कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.