भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवक्ते श्री नितीनजी दिनकर श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्रीमती गिरमे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे, सचिव दिनेश सूर्यवंशी, विश्वस्त प्रतिक बोरावके, महाले पोदार लर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ श्वेता गुलाटी, राखी सुरडकर, मेन रोड मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील साठे, कार्याध्यक्ष सूर्यकांत संगम, मानाच्या गणपतीचे सचिव मनोज नवले, वैभव सुरडकर, विक्रांत गिरमे, सोमनाथ महाले, रुपेश हर्कल, तिलक डुंगरवाल, बंडू कुमार शिंदे, विराज आंबेकर, गुरु प्रदीप वाडेकर यांच्या हस्ते श्रीराम रथातील उत्सवमूर्तीचे व श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान गणेश यांचे रूप धारण केलेल्यांचे पूजन संपन्न झाले.
यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्रीमती प्रणिता गिरमे, नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक, पंचायत समिती सभापती वंदनाताई मुरकुटे प्रिन्सिपल श्वेताताई गुलाटी, सौ शारदा सुरडकर, विद्याताई करंडे सौ राखी सुरडकर, शिवसेना महिला अध्यक्ष पूनम जाधव, सौ मानसी सरोदे अनिता मापारी वैशाली वाडेकर सौ शांता हिंगमिरे सौ कुह्रे सौ आजगे, अनिता पाथरकर साक्षी सुपेकर अर्चना हिंगमिरे रूपा भंडारी प्रियंका सोलंकी भाग्यश्री अजगे यांच्यासह शेकडो महिलांनी श्रीराम रथ ओढला.
भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते हनुमान मंदिर ट्रस्ट श्री मनोज पोरवाल, सुनील गुप्ता, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ दिलीप शिरसाठ, श्री इंगळे, चंद्रकांत परदेशी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, निलेश गीते, सुरज यादव, सुजित सुकदरे, विश्वजीत मंजीतशेठ बत्रा, राजेंद्र करंडे, योगेश ओझा, पंकज कर्मासे यांनी बोरावकेचौक येथे शोभा यात्रेचे स्वागत करून रथातील श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजन केले.
यावर्षी महाले पोदार हायस्कूल यांच्या सहभागाने शोभायात्रेला भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झाले होते या शोभा यात्रेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ सोयराबाई, शिव गुरु दादोजी कोंडदेव बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे व मावळे हे प्रथम स्थानी होते त्यानंतर संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज एकनाथ महाराज मुक्ताई असे सर्व संत व वारकरी पांडुरंगाची पालखी घेऊन दुसऱ्या स्थानी होते त्यानंतर भगवान गणेश प्रभू श्रीरामचंद्र मातासीता लक्ष्मण व हनुमान अश्वधारी रथामध्ये तिसऱ्या स्थानी होते.
आर एस फिटनेस व शिवसंकल्प फाउंडेशन यांचे ५० महिलांचे स्रीशक्ती लेझीम पथक हे देखील मिरवणुकीचे आकर्षण ठरले या लेझीम पथक वाद्याच्या तालावरती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण करत होते. त्यानंतर डीजे व लाईट शो समोर युवक युवती नाचण्याचा आनंद घेत होते व त्यानंतर विद्युत रोषणाई केलेल्या फुलांनी सजवलेल्या अर्थात उत्सव मूर्ती स्थापित केल्या होत्या.
या शोभा यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्रीराम सेवा संघाचे संस्थापक श्री कुणाल करंडे, मेन रोड मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील साठे, सूर्यकांत संगम, मनोज नवले सचिन आज गे राकेश मस्के आदिनाथ सुपेकर गणेश हिंगमिरे मच्छिंद्र हिंगमिरे दीपक इंगळे, गणेश बिंगले विक्रांत गिरमे मंगेश भोसले किशोर फासगे सोमनाथ महाले, श्रीराम सेवा संघ प्रणित श्रीराम युवा संघ, मेन रोड मित्र मंडळ, श्रीराम युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.