श्रीरामपूर : भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीरामपूर शहरांमध्ये वार्ड नंबर २ जय भीम चौक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी महामाता त्यागमूर्ती कोट्यावधी बहुजनांची माय मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मातोश्री रमाई व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित शहर युवक अध्यक्ष रफिक पठाण, संघटक अजय मगर, सहसंघटक रवी धिवर, शाहरुख पठाण, संदिप बन्सी, सुरेश छल्ले, शिवराम रहिले, संतोष डावरे, रवींद्र वायदंडे, बाबासाहेब त्रिभुवन आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.