श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज क्रांतिकारी संत : ह.भ.प.साधनाताई मुळे


श्रीरामपूर : श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज हे सोळाव्या शतकातील क्रांतिकारी संत होते. सोळाव्या शतकात त्यांनी समतेचा संदेश देताना ‘ऐसा चाहु राज मे जहा मिले सब को अन्न, छोट बडो सभ सम बसे रविदास रहे प्रस्सन’ असे म्हटले होते. त्यांनी त्याकाळी समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा,अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार, श्री संत रोहिदास महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प.साधनाताई मुळे यांनी केले.

श्रीरामपूर येथे श्री संत रोहिदास सेवा मंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रवचना दरम्यान त्यांनी संत रोहिदास महाराजांचा जीवनपट अतिशय सोप्या शब्दात उपस्थित जनसमुदाया समोर मांडला. सकाळी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या मूर्ती व प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंती उत्सावानिमित्त संत रोहिदासांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी मा.आ.लहूजी कानडे यांच्या विशेष प्रयत्नाने सुमारे २५ लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भोजन गृहाचे लोकार्पण आ.कानडे यांचे हस्ते करण्यात आले. आ.कानडे यांनी यापुढे देखील मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही देऊन मंदिर परिसराच्या विकासासाठी आणखी २० लक्ष रुपये देण्याचे मान्य केले तसेच परिसरातील रस्ते विकासासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. यावेळी आ.लहू कानडे,मा.आ. भाऊसाहेब कांबळे,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी जयंती उत्सवानिमित्त सर्व समाज बांधवाना शुभेच्छा दिल्या. संत रोहिदास महाराजांच्या आरती नंतर समाजातील युवा उद्योजक मा.रवी भाऊसाहेब डोळस यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 

या वेळी मा.आ.लहूजी कानडे,माजीआ.भाऊसाहेब कांबळे,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगरसेवक अशोक कानडे व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. दिवसभर मोठ्या संखेने भाविकांनी संत रोहीदासांच्या मूर्तीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत रोहिदास सेवा मंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post