श्रीरामपूर : बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या रस्त्याच्या कडेला गायकवाड वस्ती नजीकच्या सतिश मोटर्स जवळ भविष्यात अपघाताला निमंञण ठरणारे वडाचे झाड काढून ते तेथेच रस्यालगत पुर्नलागवड करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हे वडाचे झाड हे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे. आधीच या वटवृक्षाच्या विरुध्द बाजूला रस्त्यालगत घरे असल्याने मोक्याच्या जागीच रस्ता अरुंद झाला आहे. या वडाच्या झाडाची पुर्नलागवड करुन झाड वाचविता येईल.
या झाडाबाबत काही पर्यावरणप्रेमी उगाचच हट्ट धरीत आहेत. या रस्त्याची अनेक झाडे दिवसाढवळ्या दगडी कोळसा टाकून जाळली गेली, तेव्हा पर्यावरणवादी कोठे होते. तसेच या झाडामुळे अपघातात बळी गेले तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पर्यावरणप्रेमी उचलणार का, असा सवाल केला जात आहे.
नगर-पुणे, पुणे-बंगलोर या महामिर्गाच्या कडेची अनेक वडाची झाडे काढून तेथेच रस्त्यालगत पुर्नलागवड करण्यात आली आणि ती यशस्वीही झाली. त्याच पध्दतीने सदरच्या वडाच्या झाडाचे कोणत्याही दबावाला बळी न पडता तेथेच रुंदीकरण झालेल्या रस्त्यालगत पुर्नलागवड करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.