या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात खुले मैदान असलेले रयत शिक्षण संस्थेचे रा. ब.ना.बोरावके महाविद्यालयाचे मैदान हे कोरोनापूर्व काळात सहजगत्या सर्वसामान्यांसाठी पायी पायी फिरणे तसेच व्यायामासाठी उपलब्ध होत असे. त्याचा सर्वांना फायदा होत असे. मात्र, कोरोना काळात दक्षता बाळगली जावी याकरीता सर्वसामान्यांना उपलब्ध असलेले शहरातील मोठे मैदान कॉलेज व्यवस्थापनाने त्यांच्या अधिकारात शासकीय नियम पाळणेकामी बंद केले होते. परंतू, आजदेखील हे महाविद्यालयाचे मैदान विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांचे शैक्षणिक कामांसाठीच महाविद्यालयीन वेळेत खुले आहे. सर्वसामन्य नागरीक, पोलीस भरतीसाठी कसरत करणेकामी येणारा नवयुवक किंवा शहरातील ज्येष्ठ नागरिक यांना या मैदानावर पायी फिरणे, व्यायाम करणे यासाठी आजदेखील या मैदानाचे दरवाजे बंदच आहेत. सध्या कोरोना काळ हा संपल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले असून देखील शासनाचे कोणतेही आदेश नसताना संबंधित महाविद्यालयाचे मोठे मैदान हे सर्वसामान्यांसाठी बंद केलेले आहे.
तरी आपण श्रीरामपूर शहरातील सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व भरतीकामी सराव करणारे नवयुवक यांचेसाठी हे मैदान पुर्वरत खुले करणेकामी आपल्या स्तरावरुन आदेश देवून सहकार्य करण्यात यावेत असे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सौ. मिनाताई जगधने, संबंधित महाविद्यालय व्यवस्थापन, रयत शिक्षण संस्था आदिंना दिलेल्या या विनंतीवजा निवेदनात म्हटले आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, सलमान पठाण, आसिफ तांबोंळी,कामरान शेख, आदि उपस्थित होते.