येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच च्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मुख्तार शाह होते. व्यासपीठावर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अविनाश आदिक,प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, नगरसेवक संजय छल्लारे,ताराचंद रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते मुक्तार मणियार, माजी नगरसेवक दत्तात्रय सानप, राजेंद्र सोनवणे, याकूबभाई बागवान, कलीम कुरेशी, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव अशोक उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जयंत चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकिल सुन्नाभाई, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव गाडेकर, अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संतोष मते,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, माजी अध्यक्ष रज्जाकभाई पठाण तसेच सरवरअली मास्टर, युवा नेते तौफिक शेख, जमील शाह, शफी शाह, फयाज कुरेशी, जाफर शाह,जिजामाता तरुण मंडळाचे उपाध्यक्ष संजय साळवे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक संजय छल्लारे तसेच अशोक उपाध्ये यांनी उर्दू शाळेच्या प्रगतीचा आवर्जून उल्लेख केला. मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली या शाळेची प्रगतीची घौडदौड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात नगरसेवक मुख्तार शाह यांनी शुभेच्छा दिल्या.
आदिकांची फटकेबाजी
या कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी अचानकपणे दिलेल्या भेटी प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत व्यासपीठावरील उपस्थित माजी नगरसेवकांना चिमटे घेतले. हे सर्वजण माझे चांगले मित्र आहेत. यांच्यामुळे मी घडलो असे सांगत यातील अनेक जण मला दररोज मेसेज करीत असतात. वेगवेगळी चित्रे व फुले ते पाठवित असतात. मला आनंद एकाच गोष्टीचा आहे कि त्यांनी अजून कमळाचे फुल मला पाठवलेले नाही असे ते म्हणताच एकच हंशा पिकला. शाळा क्रमांक पाचच्या प्रगतीचे कौतुक करत अविनाश आदिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.
प्रास्ताविक भाषणात शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख यांनी शाळेमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल माजी अध्यक्ष रज्जाक पठाण यांचा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, मुख्याध्यापक जलील शेख, शाळा क्रमांक सहाच्या उपाध्यापिका लता औटी यांचा सत्कार करण्यात आला तर शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक सिद्दीक शेख हे उमराह यात्रेसाठी रवाना होत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसे दुपारच्या सत्रात शाळेचे स्नेहसंमेलन पार पाडले यामध्ये सर्वच वर्गांनी बहारदार कार्यक्रम सादर केले विशेषतः शाळा क्रमांक नऊच्या बेटीया आणि शाळा क्रमांक पाच च्या कव्वालीने उपस्थित प्रेक्षकांची खूप व्हावा मिळवली .
होते. दुपार सत्रात शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, लिपिक रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे,माजी संचालक नानासाहेब बडाख,माध्यमिक सोसायटीचे संचालक सूर्यकांत डावखर, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर सय्यद,विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमोडे, कार्याध्यक्ष शाम पटारे, गणेश पिंगळे, केंद्रप्रमुख वाघुजी पटारे, शिक्षक नेते जब्बार सय्यद, मुख्याध्यापक राजू थोरात,परवीन शेख, जावेद शेख,समीरखान पठाण,जलील शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.