महाराष्ट्राची चिरंजीव प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज - प्रा नितिन बानगुडे


वडाळा महादेव ( वार्ताहर ) छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असून सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे अखंड भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आदर्श राजे म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद झाली आहे. अठरा पगड जाती धर्मातील बांधवांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करत कुठलाही जातीभेद न मानता शुर मावळे अनेक मोहिमा फत्ते करण्यात यशस्वी झाले. अनेक गड किल्ले सर केले. आजच्या शासकिय योजना मध्ये अनेक योजनांची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यावेळी सुरु केल्या म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची चिरंजीव प्रेरणा असल्याचे प्रतिपादन बानगुडे सर यांनी केले.

जीवनात ज्यांना यशस्वी व्हायचे आहे त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करावे. शिवजयंती ऊत्सव समितीचे वतीने वडाळा महादेव येथे आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते. प्रा नितीन बानगुडे यांनी प्रथमत: त्रिंबकेश्वर महादेव देवस्थान येथे विधीवत पूजन करून मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर मंगल औक्षण स्वागत व व्यासपीठावर शिवप्रतिमा पूजन दीपप्रज्वलन  करण्यात आले.

यावेळी संयोजन समिती स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल जाधव यांनी केले. शालेय विद्यार्थी कु प्रतिक्षि पवार कुं चैतन्या उंडे, चि सोहम शेलार यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे केली.

वडाळा महादेव ग्रामपंचायत सरपंच कृष्णा पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अनिल पवार, सर्व संचालक मंडळ, आर पि आय वतीने सुरेन्द्र भाऊ थोरात व सहकारी आमदार लहू कानडे मित्रमंडळ सुरेश पवार ,गौरव कांबळे

मराठा प्रतिष्ठान श्रीरामपूर विलास जाधव, लासुरे नाना, रावसाहेब तोडमल यांच्याकडुन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी  वडाळा महादेव तसेच पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस हवालदार  संतोष परदेशी पोलिस नाईक किरण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सुत्रसंचलन प्रा आदिनाथ जोशी यांनी केले तर आभार प्रदिप वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‌भरत पवार,क्षितीज पवार, शुभम पवार, पंकज‌ पवार,महेश महाले,राजेंद्र थोरात‌ आदीसह समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम ‌घेतले व्याख्यानास महिलांची लक्षणीय उपस्थिति होती.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post