श्रीरामपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महात्मा गांधी चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकनेते माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. बडाख, विभाग प्रमुख किशोर फाजगे, वाहतूक सेना शहर संघटक यासीन सय्यद ,युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, उपशहर प्रमुख रोहित भोसले, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख रामा अग्रवाल, बाबा वाघ, नाना पाटील, प्रवीण फरगडे, दिनेश पोपळघट , आदित्य आदिक, विजय खाजेकर , गोपाल वायंदेशकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते.