श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नाराधामाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कठोर कलम लावून कोर्टात पोलिसांनी सक्षम बाजू मांडवी असे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे, मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुका अध्यक्ष गणेश दीवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक श्री गवळी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे घडलेल्या घटनेचा निषेध करून म्हणाले की खंडाळा येथील दोन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणार्या लिंगपिसाट व शैतानी प्रवृत्तीच्या भास्कर मोरे ह्या व्यक्तीवर कठोर कलम लावून ह्याला कोर्टामार्फत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावे कारण गेल्या काही वर्षापूर्वी भास्कर मोरे याने असेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केले होते तो सध्या जामिनावर बाहेर आला होता तो लिंगपिसाट स्वभावाचा असून शैतानी प्रवृत्ती त्याच्या अंगात आहे त्यामुळे तो बलात्कार सारखे कृत्य वारंवर करत आहे असा शैतानी प्रवृत्तीच्या माणसाला जामीन होणार नाही व त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे जेणे करुन यापुढे इतर कुठल्याही मुलींवर अशा प्रकारचे कृत्य होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर सर्व कलमे लावून या लिंगपिसाट व शैतानी प्रवृत्तीच्या भास्कर मोरेला कोर्टात फाशीची शिक्षाच झाली पाहिजे यासाठी पोलिसांनी कोर्टात सक्षम बाजू मांडावे असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले
याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष श्याम लांडे,मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रतन वर्मा, मनसे विद्यार्थी सेना शहर संघटक अध्यक्ष विशाल लोंढे, मनसे तालुका संघटक विकी राऊत,सचिव भास्कर सरोदे, तालुका सरचिटणीस अरमान शेख, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कारले, शहर संघटक निलेश सोनवणे, शहर उपाध्यक्ष राजू जगताप, सचिन कदम, शहर विभाग अध्यक्ष लखन कुरे, नितीन खरे, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष साहिल गायकवाड, विकी शिंदे, विद्यार्थी सेना तालुका सचिव अतुल खरात, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष विकी परदेशी, राहुल शिंदे मारुती शिंदे बाबजी शिंदे गणेश रोकडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.