गुलमोहर कॅालनीत महिलांनी आरती करत साजरी केली शिवजयंती


श्रीरामपूर : हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती “श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव” गुलमोहर हौसिंग को-ॲाप-सोसायटी येथे उत्साहात पार पडल्याची माहीती सोसायटीचे मुख्य प्रवर्तक केतन खोरे यांनी दिली.


पुर्णवादनगर परीसरातील गुलमोहर कॅालनीतील शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन माजी नायब तहसिलदार अनिल उनवणे, ज्येष्ठ नागरीक किशोर चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, प्रद्या उनवणे, सविता घोडेकर, संगिता पंडीत, मनिषा बर्डे, वर्षा जाधव, रेखा होते, दिक्षा सागडे, गंगूबाई घोडेकर, सविता न्हावले, गौरी उनवणे, साक्षी बर्डे, वर्षा भोईर आदींसह महिलांनी महाराजांची महाआरती केली. तर शालेय विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनपटावरील पोवाडे सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी गुलमोहर कॅालनीचे अध्यक्ष अण्णासाहेब पंडीत, संतोष घोडेकर, विवेक भोईर, राम न्हावले, संतोष होते, विनायक जाधव, मयूर न्हावले, राहुल सांगडे, अमोल माळवे, अरुण बर्डे, स्वप्निल उनवणे, तुषार चांडवले, कुणाल दहीटे आदींसह सदस्य उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post