श्रीरामपूर : 'शिव स्वराज्य' सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेतील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी 'शिव स्वराज्य मंच'चे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वडीतके, माजी नगराध्यक्षआ अनुराधा आदीक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. जगधने, पत्रकार भांड, अविनाश पोहेकर, संदीप शेडगे, के के आव्हाड, अमित कुकरेजा, युसुफ शेख, नागेश साठे, चंदू परदेशी, दीपक आव्हाड, सिकंदर तांबोली, आर के खामकर, फैजान पठाण, लहुजी सेनेचे रईस शेख, स्वराज मंडलिक, राजू कमवते, विशाल मोजे, रोहित संगम, नरेश शेट, वलेशा बंटी, शेठ गुप्ता, रमीज पोपटीया आदी उपस्थित होते.