श्रीरामपूर : हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानूसार गौतम आदानी व त्यांच्या कंपन्यांनी शेअर बाजारात मोठी हेराफेरी आणि फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अवघ्या दहा दिवसात या उद्योग समूहाचे दहा लाख कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या भांडवलाचे मोठे नुकसान झाले असून, त्यास सर्वस्वी गौतम अदानी व त्यांच्या कंपन्यांनी केलेली अफरातफरी कारणीभूत आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे.
भाजपा शासित सरकारच्या दबावाला बळी पडून अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना त्यांच्या चुकीच्या कृतीची जाणीव करून देण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस व श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत अदानी समूहाला साथ देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी तहसील कचेरीवर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की सर्वसामान्य जनतेने आपल्या कष्टाचा पैसा एसबीआय व एलआयसी सारख्या वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक केला. अदानी समूह दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. यानंतर साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की केंद्रातील भाजप सरकार आणि आदानी यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे भारतातील राष्ट्रीयकृत बँकांनी व महत्त्वाच्या वित्तीय संस्थांनी अदानी समूहाला लाखो कोटींचे कर्ज दिले. अदानी उद्योग समूह केव्हाही दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे बँकांनी केलेला वित्त पुरवठा धोक्यात आला आहे. त्याचप्रमाणे एलआयसी ने केलेली गुंतवणूक सुद्धा संकटात सापडलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसाला अशा वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यानंतर जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर बाजार समितीचे मा. संचालक सुधीर नवले, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुभाष तोरणे, सरवरअली मास्टर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे यांनीही आंदोलन प्रसंगी आपापले मनोगत व्यक्त करत अदानी समूहाला साथ देणाऱ्या भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली.
यावेळी मा तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. या आंदोलन प्रसंगी मा नगरसेवक प्रेमचंद कुंकूलोळ, रितेश रोटे, दिलीप सानप, सुहास परदेशी, श्याम आडांगळे, अण्णासाहेब डावखर, श्रीरामपूर तालुका दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, अशोकराव जगधने, प्रवीण नवले, पुंडलिक खरे, रावसाहेब आल्हाट, बाबा वायदंडे, संजय गोसावी, सुरेश ठुबे, युनुस पटेल, सिद्धार्थ फंड, रवी खिलारी, संतोष परदेशी, सुभाषराव गायकवाड, मुन्ना शेख, दिपक वमने, सरबजीतसिंग चूग, वैभव पंडित, जावेद शेख, जाफर शहा, रितेश एडके, सुनील साबळे, मंगल सिंग साळुंखे, नजीरभाई शेख टेम्पोवाले, बुरानभाई जमादार, गणेश छल्लारे, प्रमोद जगताप रितेश चव्हाणके, शाहरुख शेख, विलास बोरावके, सनी मंडलिक, अमोल शेटे, प्रशांत डावखर, विशाल साळवे, कृष्णा पुंड, योगेश गायकवाड, अमोल नाईक, भैयाभाई आत्तार, राजू डुकरे, असिफ शेख, निलेश बोरावके, अमोल चिंतामणी, तेजस बोरावके, विशाल दुपाटी,जमील शहा, सुभाष पोटे, प्रणव शिंदे,सुरेश बनसोडे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.