श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील दोन वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाविरोधात जलदगती न्यायालयात खटला दाखल होऊन लवकरात-लवकर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
खंडाळा ( ता.श्रीरामपूर) येथील दोन वर्षाच्या चिमुकल्या निरागस मुलीवर बलात्कार केल्याचे नुकतेच उघडकीस आले. ही बाब अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे. यावर योग्य कारवाई करण्यासाठी वेळीच पावले उचलले गेले नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह तौफिक शेख, आसिफ तांबोळी, कलीम शेख वेल्डर,इम्रान मन्सूरी, संजय वाघ,दानिश शहा आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.