पुणे विद्यापीठाच्या वतीने ७१ किलो वजन गटात तृप्ती माने व ८७ किलो वरील वजन गटात रूचिका ढोरे यांनी रौप्यपदक पटकावले.तसेच हर्षदा गरुड, योगिता खेडकर, नूतन दराडे, दिया व्यवहारे, शितल जाधव, वैष्णवी इप्पर व धनश्री बेदाडे या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक उपविजेतेपद मिळवण्यास मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेमधून उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी हर्षदा गरुड, नूतन दराडे, तृप्ती माने,योगिता खेडकर व रुचिका ढोरे या खेळाडू पात्र झाल्या आहे. या उपविजयी संघाचे संघ व्यवस्थापक प्रा. विजय देशमुख (बाबूजी आव्हाड महाविद्यालय,पाथर्डी),संघाचे मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे व राजेंद्र सोनवणे हे होते.
या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.