यावेळी संगमनेर तालुक्यातील सर्व व्यवस्थापन मुख्याध्यापक यांना रस्ते सुरक्षा सप्ताह सांगता समारंभाच्या निमित्ताने त्याच बरोबर शालेय परिवहन समिती निमित्त मोटर वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी शालेय परिवहन समिती त्याचबरोबर रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक धीरज भामरे यांनी रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सोनवणे राणी यांनी रस्ता सुरक्षा विषयी प्रतिज्ञा देऊन रस्ता सुरक्षेचे साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी विस्तार अधिकारी मंदाताई दुर्गुडे , केंद्र प्रमुख दशरथ धादवड, साखरे मॅडम, केंद्रप्रमुख अशोकराव गोसावी यावेळी संगमनेर तालुक्यातील सर्व प्राचार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा ,व खाजगी शाळा यांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सह्याद्री उच्च माध्यमिक मुख्याध्यापक एम. वाय दिघे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. सातपुते यांनी केले.
संगमनेर ( प्रतिनिधी ) दिनांक 17/01/2023 रोजी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत संगमनेर येथील सह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या के.बी दादा देशमुख हॉलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.