Shrirampur RTO : रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार


श्रीरामपूर : रस्ता सुरक्षा नियम हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेला निरंतर विषय आहे. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने अनेकांचा दुर्दैवी बळी जातो आणि वित्तहानी करणारे अपघात होतात. या अपघातांमुळे केवळ परिवाराचे नुकसान होते असे नाही, तर देशाचे देखील नुकसान होते. दुर्देवाने अपघातात जाणारे बळी हे अधिकांश तरुण वर्गातले असतात. त्यामुळे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी केले.

अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहन चालक व मालक यांना रस्ते सुरक्षा विषयक नियमांची माहिती व्हावी म्हणून नियमावली फलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थित ऊस वाहतूक वाहन चालकांना रस्ता सुरक्षा नियम विषयी उर्मिला पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी संचालक काशिनाथ गोराणे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सहायक उपप्रादेशिक अधिकारी डघळे, कारखान्याचे व्हा चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी चेअरमन सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, संचालक हिम्मतराव धुमाळ, पुंजाहरी शिंदे, बाळासाहेब शिंदे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, केनयार्ड सुप्रीटेंडेंट भिकचंद मुठे, गेस्ट हाऊस इन्चार्ज रमेश आढाव, राजेंद्र उघडे आदींसह वाहन चालक, मालक उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post