गोंधवणी परिसरातील पाळीव डुकरांचा बंदोबस्त करावा; नागरीकांची मागणी


श्रीरामपूर : शहरालगत असलेल्या गोंधवणी गाव परिसरातील पाळीव डुकरांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अन्यथा याप्रश्नी धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, पंकज देवकर, सचिन लबडे, प्रज्वल शेंडे, राहुल सोनवणे आदींनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंधवणी गाव परिसरात काही नागरीकांनी डुकरे पाळलेली असून या डुकरांची संख्या प्रचंड आहे. ही पाळीव डुकरे मोकाट सोडलेली असल्यामुळे त्यांचा परिसरातील नागरीकांना गेल्या एक वर्षापासून भयंकर त्रास होत आहे. डुकरे घरात घुसतात तसेच शेतातील पिकांचेही अतोनात नुकसान करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांना दिलेल्या निवेदनावर सचिन लबडे, संकेत सोनवणे, प्रज्वल शेंडे, सचिन धिवर, ऋषिकेश वाणी, अजय वाणी, उत्तम देवकर, संकेत फरसुंगे, अभिषेक लबडे, राहुल सोनवणे, चेतन तनपुरे, आबासाहेब लबडे, लक्ष्मण शिंदे, संदीप वायकर, शिवाजी लबडे, कृष्णा लबडे, रामचंद्र लबडे, शंकर लबडे, रविंद्र आंबेकर, पंकज देवकर आदींच्या सह्या आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post