राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा विजेत्या पुणे विभाग मुलींच्या संघाचे श्रीरामपुरात भव्य स्वागत व सत्कार


श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : बाचणी, कोल्हापूर येथे दिनांक २० जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करताना त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा संघाने विजेतेपद पटकावले.

आज बेलापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी संघाचे आगमन होताच पत्रकार स्वामीराज कुलथे,पत्रकार प्रदीप आहेर,प्राचार्य डॉ योगेश पुंड, ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक राजू लांडे,पत्रकार प्रवीण जमदाडे,प्रियंका यादव,क्रीडा रत्न नितीन बलराज,गौरव डेंगळे आदींनी संघाचं पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.

मुलींच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून नगर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले आहे.संघाचे मनापासून खूप खूप कौतुक आणि भविष्यात हा संघातील खेळाडू देशाचे नाव जागतिक स्तरावर नक्कीच उंचवेल असे प्रतिपादन कुलथे यांनी शुभेच्छा व्यक्त करताना केले.राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ८ विभागांनी सहभाग नोंदवला होता. पुणे, लातूर, मुंबई, अमरावती, नागपूर कोल्हापूर, नासिक व औरंगाबाद. पुणे विभाग संघाने अंतिम सामन्यात नाशिक विभागाचा सरळ २ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. संघाचे कर्णधार म्हणून भक्ती ताजनेने उत्कृष्ट कामगिरी केली तर संघाचे प्रशिक्षक म्हणून पापा शेख यांनी काम बघितले. विजयी संघातील सर्व खेळाडू यशवंत स्पोर्ट्स क्लब नेवासा फाटा या ठिकाणी नियमित व्हॉलीबॉल खेळाचा सराव करतात.

विजयी संघातील खेळाडू पुढील प्रमाणे भक्ती ताजने (कर्णधार), रक्षा खेनवार, प्रणिता रोडे, तनुश्री बिडवई, प्रतिक्षा यादव,मुक्ता झगडे, ऋतुजा कुंभार, भारती शिंदे, नीरळ मांदळे, श्रद्धा रनखेवरे, पूजा डोळस व आकांक्षा शेरे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post