खटोड कन्या विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न


भि.रा.खटोड कन्या विद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण करतांना विद्यालयाचे नवनियुक्त चेअरमन श्री.दत्तात्रय साबळे, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव श्री.रणजीत श्रीगोड, ज्युनिअर कॉलेज चेअरमन श्री.गणेश देशपांडे, अरुण धर्माधिकारी, विजय नगरकर,  प्राचार्या सौ. विद्या कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. अनिता शिंदे, सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी, सौ. कल्पना जायभार, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. नम्रता शेंगाळ, कु. प्राची ढोकचौळे आदी उपस्थित होते. ( छाया - विशाल अंभोरे, श्रीरामपूर)

श्रीरामपूर : येथील हिंद सेवा मंडळाच्या भि.रा. खटोड कन्या विद्यालयात आज शासनाच्या आदेशानुसार ढोल पथकासह प्रभात फेरी काढून विद्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संपन्न झाले.

विद्यालयाचे नवनियुक्त चेअरमन व स्वामी विवेकानंद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रय साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव श्री. संजय जोशी, सहसचिव श्री.रणजीत श्रीगोड, कार्यकारिणी सदस्य श्री.अशोक उपाध्ये, ज्युनिअर कॉलेज चेअरमन श्री.गणेश देशपांडे, स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर गोरख बारहाते, दत्तात्रय काशीद, अरुण धर्माधिकारी, विजय नगरकर,  प्राचार्या सौ. विद्या कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. अनिता शिंदे, सेवक प्रतिनिधी आदिनाथ जोशी, शिक्षक प्रतिनिधी प्रा. सतीश म्हसे, चेतन वाजे, सौ. कल्पना जायभार, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. नम्रता शेंगाळ, कु. प्राची ढोकचौळे आदी उपस्थित होते. 

यावेळी मानद सचिव श्री. संजय जोशी, सहसचिव श्री.रणजीत श्रीगोड व नूतन चेअरमन श्री.दत्तात्रय साबळे यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.

प्रास्ताविक प्राचार्या सौ. विद्या कुलकर्णी यांनी केले. परिचय आदिनाथ जोशी यांनी दिला. ध्वजगीत सौ. उषा गाडेकर व अवधूत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभाग विद्यार्थिनींनी सादर केले. एन.सी.सी. विभाग प्रमुख सौ. सोनाली पुंड व गाईड प्रमुख श्रीमती विना धुस्सा यांनी संचालन सादर केले.बक्षीस यादी वाचन समिती प्रमुख सौ.रूपाली केवल सौ. निर्मला लांडगे, श्री.चंद्रकांत शिंदे तर एन.सी.सी. यादी वाचन सौ.सोनाली पुंड यांनी केले. संविधान वाचन सौ. वृशाली कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी गटणे यांनी केले. प्रभात फेरी नियोजन श्री. विजय आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी व अकरावी वर्ग शिक्षकांनी परिश्रम घेतले तर बँड पथक संचालन क्रीडाशिक्षक चंद्रशेखर वाघ यांनी केले. क्रीडा शिक्षिका सौ.सुनिता दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी बहारदार लेझीम नृत्य सादर केले. यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख, शिक्षक व सेवक वृंदांनी परीश्रम घेतले. ध्वजारोहणाला विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post