श्रीरामपूर पालिका | निकृष्ट कामे करणाऱ्या 'कंत्राटदार महालें'वर अद्यापही कारवाई नाही..! ठेकेदार व अधिकाऱ्यांचे गौडबंगाल आहे का?? भिम गर्जना संघटनेचे फिरोजभाई पठाण यांचा सवाल


श्रीरामपूर : नगरपरिषद हद्दीत कंत्राटदार विक्रांत महाले यांच्याकडून चालू असलेले रस्त्यांचे कामे अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर करून सुरु असल्याने भिम गर्जना संघटनेने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. निवेदन देऊनही ठेकेदारावर पालिका प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही. ठेकेदारावर प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नसून, बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे काही गौडबंगाल का? असा सवाल भिम गर्जना संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी उपस्थित केला आहे.

श्रीरामपूर पालिका हद्दीत सध्या सुरु असलेले रस्त्यांचे कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरु असून, याबाबत 'भिम गर्जना संघटने'चे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळल्यास कामाच्या करारनाम्यातील व निविदेतील अटी-शर्तीचा भंग केल्याचे समजून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने ठेकेदाराला दिला होता. दरम्यान, दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदार विक्रांत दिलीप महाले यांना केलेल्या कामाची टेस्टिंग रिपोर्ट सादर करावे. कामाच्या समक्ष पाहणीमध्ये सदर तक्रारी तथ्य असल्याचे आढळून आल्यास कामाच्या करारनाम्यातील व निविदेतील अटी शर्तीचा भंग झाला असे समजून कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदार विक्रांत महाले यांना बजावली होती. परंतु, ठेकेदाराकडून कोणतेही प्रकारचे रिपोर्ट व मटेरियल संदर्भातील कागदपत्रे पालिका प्रशासनाला सादर केले नसल्याचे फिरोजभाई पठाण यांनी सांगितले.

मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या नोटीसीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली असून ठेकेदारांना प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नाही. बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप फिरोजभाई पठाण यांनी केला.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post