यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिव ऍड.समीन बागवान,सतीश बोर्डे, सुरेश पवार, नानासाहेब रेवाळे, राजेंद्र औताडे, मुख्याध्यापक सुनील साळवे सर, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, सुदाम पटारे, अभिजित लिप्टे, कवी आनंदा साळवे, अमोल आदिक, भैया शाह, जमीर पिंजारी, इम्रान शेख, मेहेबूब शेख, अजिंक्य ऊंडे, भराडी सर, मुठे सर, आशिष शिंदे, निखिल कांबळे, रवी भांबारे, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे, कल्पेश माने यांच्यासह लोकहक्क फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजकारणातून समाजकारण करत असताना लोकप्रिय आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या लोकहक्क फाऊंडेशनच्या माध्यमातुन यावर्षीचा वाढदिवस साजरा करण्याचा मानस अशोक नाना कानडे यांचा होता. त्यानुषंगाने वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रम आणि असंघटित कामगारांना ब्लॅंकेट वाटप, डी.डी.कचोळे विद्यालयाच्या निराश्रित विध्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. डी. डी. काचोळे विद्यालय येथे बोलताना अशोक कानडे म्हणाले की, समाज सेवेची भावना मनात रुजविल्यास कुठली गोष्ट अशक्य नाही. गेल्या तीन वर्षांपासून आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या माध्यमातून मतदारसंघात तळागाळातील घटकांपर्यंत काम करण्याची संधी मिळाली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असतात. त्यासाठीही योगदान देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच वाघुंडे दांपत्याने वृद्धाश्रमाची सुरुवात करुन मोलाचे कार्य उभे केले आहे. वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. खऱ्या अर्थाने अशा उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आनंद मिळाला अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. वाघुंडे परिवार करत असलेल्या या अनमोल कार्यात आमदार कानडे साहेबांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माझा येथील साजरा करण्यात आलेला वाढदिवस अविस्मरणीय राहील यात शंका नाही आणि माझा हा आनंद मी पुढील काळात माझ्या सर्वच सहकारी सोबत द्विगुणीत करील.
यावेळी तालुकाध्यक्ष अरुण पाटील बोलतांना म्हणाले की, आमदार लहू कानडे यांच्या खांद्याला खांदा लावून अशोक नाना कानडे काम करत असतात. एखादा प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे हा त्यांचा विशेष गुण आहे आणि त्यांच्या ह्याच स्वभावामुळे मोठ्या प्रमाणावर मित्र त्यांना जोडले गेले आहे. लोकहक्क फाऊंडेशनचे समाजहिताचे कार्य प्रेरणादायी असल्याची त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्र्वर मुरकुटे, बार अससिएशनचे उपाध्यक्ष एडवोकेट समीन बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काल दिवसभरात तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी समक्ष भेटून अशोक कानडे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिकलकरी मोहल्ला, विश्वकर्मा फाऊंडेशन, माऊली वृद्धाश्रम, जनता विद्यालय, यासह अनेक ठिकाणी अशोक नाना कानडे यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.