श्रीरामपूर | 'ग्रॅज्युएट चहा'कडून पत्रकारांचा सत्कार


श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जामभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त श्रीरामपूर शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ ग्रॅज्युएट चहा व लस्सीच्या वतीने, आज दि. ०६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी होते. यावेळी श्रीरामपूर शहरातील सर्व पत्रकार मित्रांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

ह्याप्रसंगी,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, अशोक गाडेकर, शिवाजी पवार, सुनील नवले, प्रदीप आहेर,स्वामिराज कुलथे, नितीन चित्ते, युनूस इनामदार, राजेंद्र बोरसे, रवी भागवत, दिपक उंडे, असलम बिनसाद, स्वप्निल सोनार, राजू मिर्झा, प्रवीण जमदाडे, सचिन चौधरी, प्रियांका यादव, चंद्रकांत वाकचौरे, बॉबी बकाल, नितीन बलराज तसेच बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विभागीय चित्रपट गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे खंडाळा गावचे प्रसिद्ध गायक सुनील खरात यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुनील खरातने "कहो ना कहो" हे गीत गाऊन सर्व पत्रकार व उपस्थितांचे मनोरंजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जमदाडे व प्रियांका यादव यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक राजेंद्र लांडे व स्वप्निल लांडे यांनी केले. प्रमुख पाहुणे व सर्व पत्रकारांचे आभार गौरव डेंगळे यांनी व्यक्त केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post