१७ नोव्हेंबर २०२२ रोजी अरुण बडाख यांनी प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्तेचे कारण सुसाईड नोट मध्ये सविस्तर लिहिले आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांनी ५ जणांवर फक्त आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये विजया नंदू कदम, सुधीर नंदू कदम, अमोल अशोक मतकर (पार्टनर सेतु केंद्र पाचेगाव), गणेश रमेश पंडुरे, नंदू विष्णु कदम यांचा समावेश आहे.
मयत अरुण बडाख याचे बंधू ज्ञानेश्वर बडाख यांनी निवेदनात म्हंटले आहे की, माझा भाऊ अरुण एकनाथ बडाख यास विजया नंदू कदम ( रा.पाचेगाव, ता.नेवासा ) हिने प्रेमाच्या जाळ्यात फसवून सुमारे पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करून वरील 5 आरोपींनी मानसिक छळ, ब्लॅकमेल, मारहाण व सामाजिक बदनामी करून त्याला वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून अडचणीत आणले व आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे त्याने दि. १७ नोव्हेंबर २०२2 रोजी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती त्याच्या स्वहस्ताक्षरात साहिनीशी त्याच्या सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. यातील आरोपींनी अरुण याचा मोबाईलचा व कॉम्प्युटर डाटा मुलीसोबतचे व्हिडीओ आणि फोटो अमोल मतकर, सुधीर कदम आणि गणेश पंडुरे ( रा.पाचेगाव ) या तिघांनी त्याच्या परवानगीशिवाय प्रसारित करून त्याची बदनामी केली. मारहाण करून, वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी विजया नंदू कदम हिने पाच ते सहा लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिला.
पोलीस प्रशासनाला मयत अरुण याचा मोबाईल, सुसाईड नोट, व्हायरल केलेले फोटो आणि व्हिडीओ असे सर्व पुरावे दिले असून अद्याप वरील आरोपी अटक झालेली नाही. इंटेरियम जामीन घेऊन आरोपी मोकाट फिरत आहेत. सदर गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात फक्त 306/34 लावण्यात आला असून आर्थिक फसवणूक, मारहाण, धमकी, माहिती तंत्रज्ञान कायदाचे उल्लंघन हे कलम लावण्यात आलेले नाही. वारंवार पोलीस तपास अधिकारी यांना विनंती करूनही कलम वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपी ना लगेच अटकपूर्व जामीन मंजूर झाला. त्यानंतर सेशन कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून आता आरोपी हे हाय कोर्टात गेले आहेत. ११ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी होईल. गेले दिड महिनापासून आरोपी मोकाट फिरत आहेत.
१७ नोव्हेंबर २०२२ रोजी मयत अरुण हा सुसाईड नोट लिहून घरातून गेला, ही माहिती आणि सुसाईड नोट तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२२ हे पाच दिवस आरोपींना साधी चौकशी सुद्धा झालेली नव्हती. हे पाच दिवस आरोपींना मिळाले. आरोपी हे पाचेगाव ता नेवासा येथील मूळ रहिवाशी आहे अंतर जास्त लांब नव्हते. आरोपी हे घटना घडल्यानंतर २२ तारखेला कोर्टात अटकपूर्व जामीन घेतात हि प्रशासनाने केलेली हलगर्जी आहे. याचा अर्थ पोलीस प्रशासन आरोपींना सरळसरळ पाठीशी घालून त्यांना अटकेपासून संरक्षण देत असल्याचे ज्ञानेश्वर बडाख यांनी म्हंटले आहे. आरोपीच्या गुन्ह्यांमध्ये त्वरित कलम वाढ करावी. हाय कोर्टात अटकपूर्व जमीन रद्द करून आरोपींना त्वरित अटक करावी, कठोर शिक्षा द्देऊन माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा. असे न झाल्यास मी व माझे संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ज्ञानेश्वर बडाख यांनी सांगितले. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही अपंग आहोत. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मयत भाऊ पाहत होता. मी फिर्यादी असल्याने मला फिर्याद मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन मला व माझ्या मयत भाऊ अरुण ला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मयत अरुण याचे बंधू ज्ञानेश्वर बडाख यांनी केली आहे.