पोलीसांच्या लेखी आश्वासनानंतर भाजपा-मनसेचे उपोषण स्थगित


श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :  "हुतात्मा स्मारक" हा नगरपालिका व पाटबंधारे यांच्याशी संबंधित विषय आहे. आरटीओ कार्यालया संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सखोल तपास होवून आरोपी अटक होतील असे लेखी अश्वासन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिल्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी  सुरू केलेले उपोषण स्थगीत करण्यात आले.

26 जानेवारीला स्थापित झालेले हुतात्मा स्मारक व आरटीओ कार्यालयाशी संबंधित प्रश्ना संदर्भात परवापासून अचानक भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी पासून उपोषणाला सुरु केले होते . त्यासंदर्भात पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी  यांच्याशी चर्चा होऊन त्यांनी वरील प्रमाणे आपली भूमिका स्पष्ट केली . पोलीस निरीक्षक गवळी  व भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथ्था , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे , विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप शिरसाठ  ,माजी सैनिक महासंघाचे अध्यक्ष कृष्णा सरदार,नगरसेवक रवी पाटील , बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी  ,भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय पांडे , संजय यादव  ,सोमनाथ पतंगे  ,सोमनाथ कदम  ,गणेश भिसे  ,संदीप वाघमारे , विजय लांडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपोषणाला काल संध्याकाळी आमदार लहू कानडे यांनीही भेट देऊन आपला पाठिंबा दिला होता.

७४ व्या प्रजासत्ताक दिनी छत्रपती संभाजी महाराज चौकात स्थापन झालेल्या हुतात्मा स्मारका संदर्भात पोलिसांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला होता .त्यामुळे भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने गांधी चौकात अचानक उपोषणास सुरुवात केली होती . त्या संदर्भात पोलिसांकडून स्पष्टपणे खुलासा आल्याने हुतात्मा स्मारका विषयीचा निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला तसेच आरटीओ कार्यालयातील गूंडगिरी व त्या संबंधात दाखल झालेले गुन्हे या सर्वांची सखोल चौकशी होऊन पोलीस कडकपणे कारवाई करतील असे पोलिसांनी लेखी अश्वासन दिल्याने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी सुरू केलेले उपोषण स्थगीत करण्यात आले

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post