२०१७ पासून दरवर्षी रथसप्तमीला प्रभाग क्र.१६ परिसरासह शहरातील महिलांसाठी विविध उपक्रमाने साजरा होणाऱ्या हळदी कुंकू समारंभाच्या यंदाच्या वर्षी वाय.जे. अँकरिंग प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ परंपरेचा व श्रीरामपूरचे गायक फत्तुभाई सय्यद यांच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीने साजरा करण्यात आला.
यावेळी जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा, तळ्यात मळ्यात स्पर्धा, चेंडू फेक स्पर्धा, उत्कृष्ट उखाणासह विविध स्पर्धांमुळे महिलांच्या उत्साहात भर पडली. जुन्या-नव्या गाण्यांच्या गायनात उपस्थित महिलांनी सहभाग नोंदवत आपली गायन कला सादर केली. कार्यक्रम सोहळ्यात बोलताना माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे यांनी हळदी कुंकुवाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्याचा आमचा मानस असून यापुढील काळातही ही परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी पार पडलेल्या विविध स्पर्धेत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक शारदा सुरडकर यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. तर पूजा हेंद्रे, अंजली कु-हाडे, रेणुका आढाव, हेंद्रे आजी, सारिका कांबळे, लता सूर्यवंशी या विजेत्या ठरल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री शर्मा, सुनीता मोटे, मोनाली देशमुख, सीमा घोरपडे, सुवर्णा रोडे, कुंभकर्ण ताई, सविता घोरपडे, कुणाल दहिटे, श्रद्धा खैरनार, ऋषिकेश पाटील, तोहीत पिंजारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रविण जमधाडे, प्रियंका यादव यांनी केले.