संविधान बचाव समिती व मुस्लीम समाजातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा


श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) येथील संविधान बचाव समिती व मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकाचा ७४ वा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.मौलाना आझाद चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्रीरामपूर भूषण डॉक्टर तोफिक शेख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शहरातील सर्व पक्षीय व सर्वधर्मीय मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,नगरसेवक मुजफ्फर शेख, प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तौफिक शेख यांनी याप्रसंगी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास नगरसेवक अंजुम शेख, दिलीप नागरे, मुख्तार शाह, रईस जहागीरदार,बंटी जहागीरदार, मुन्ना पठाण, अल्तमश पटेल, मुख्तार मणियार, कलिम कुरेशी, नज़ीर मुलानी, रज्जाक पठाण, अबुबकर कुरेशी, जलील काज़ी,मुहम्मद पठान, सत्यनाथ शेळके, मेहबूब कुरेशी,तौफीक़ शेख, सरवर अली सय्यद, दिलावर कुरेशी, संविधान बचाव समिती चे अध्यक्ष अहमद जहागीरदार, साजीद मिर्ज़ा, फिरोज़ पठान, नदिम तंबोली,आदिल मखदुमी,जावेद तंबोली, फिरोज़ दस्तगीर,अबू पेंटर, अबुल मण्यार, सलिम झुल्ला, फारुक शाह, आसिफ सर, एजाज चौधरी,मोहसिन बागवान,

फयाज़ बागवान, डॉ राज शेख,जुनेद काकर, सरवरअली मास्टर,ज़फ़र शाह, ज़ाकिर शाह,रियाज़ बागवान,अशफाक शेख, सलिम टर्नर,सलिम शाह, इसाक शेख, प्रदीप आहेर,नज़ीर भाई टेंपोवाले, उमर बागवान, रफिक पठाण, मुदस्सर सय्यद,डॉ. मन्सूर शाह, गुलामरसूल शेख, बापू वैराळ,शिल्पा आव्हाड, रेवती चौधरी, अर्जुन आदिक आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाचच्या विद्यार्थिनींनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी देखील याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सलीमखान पठाण यांनी केले तर आभार संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमद जहागीरदार यांनी मानले. यानिमित्ताने मौलाना आझाद चौकात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post