श्रीरामपूर : हजरत ख्वाजा गरीब नवाज छट्टी मुबारक निमित्त मस्तान युथ फाउंडेशन व भीम गर्जना सामाजिक संघटना श्रीरामपूर शहर युवक आघाडीच्या वतीने वतीने अन्नदान भंडाऱ्याचा कार्यक्रम श्रीरामपूर शहरामध्ये हजरत खाजा गरीब नवाज रहे यांच्या छट्टी मुबारक निमित्त मस्तान युथ फाऊंडेशन भीमगर्जना शहर युवक आघाडीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अन्नदान भंडार्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी वार्ड क्रमांक 2 अहिल्यादेवी नगर अत्तारीया मज्जिद जवळ पाटाचा कॅनॉल या ठिकाणी आयोजित केला आहे.
परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भीम गर्जना संघटनेचे शहर युवक अध्यक्ष रफिक भाई पठाण यांनी केले आहे.