राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक आकाश बेग यांच्या सुचनेवरून राष्ट्रीय अध्यक्ष सागरभैया बेग यांनी महेश गायकवाड यांना निवडीचे पञ दिले. यावेळी श्रीरामपूर कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब थेटे, भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष दताञय खेमनर, राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर शेटे पाटील, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अंकुशभाऊ जेधे, गोरख जेधे, संघर्ष दिघे पाटील, जयंत भैया थेटे, अंजिक्य काते, भाजपा भटके विमुक्त शहर अध्यक्ष गणेश राऊत, भाजपा भटके विमुक्त तालुका उपाध्यक्ष दिपक गिळे, ललित राऊत, स्वप्नील गायकवाड, बंटी पाटोळे, भाजपा अनुसुचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष मोहन आंढागळे, बंटी आंढागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दताञय खेमनर यांनी राष्ट्रीय श्री राम संघ ही अल्पवधित राज्यात नावारूपाला आलेली पहिली हिंदूत्वादी संघटना आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाने लव्ह जिहाद व धर्मांतर या प्रकरणी मोठा आवाज उठवला आहे. श्रीरामपुर शहरामध्ये अधात्मिक बाल संस्कार केंद्र सूरू करून लहान मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम राष्ट्रीय श्रीराम संघाकडुन सुरु आहे. राज्य सध्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे गाव तिथ शाखा अभियान सूरु आहे, अशी माहिती खेमनर यांनी दिली. राष्ट्रीय श्रीराम संघामध्ये जास्तीतजास्त हिंदु तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील राष्ट्रीय श्री राम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग उपस्थित बांधवाना केले.