श्रीरामपूर : महाविद्यालयीन तरुणांमध्ये समाजसेवा, राष्ट्रनिष्ठा, समप्रतिष्ठा, श्रमसंस्कार याची जाणीव निर्माण करून देणारा राष्ट्रीय सेवा योजना हा महत्त्वाचा विभाग आहे. श्रमसंस्कार हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. यासाठी विद्यार्थ्यांन श्रमसंस्काराचे धडे महाविद्यालयीन जीवनामध्येच मिळाले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी जीवनात लाज न बाळगता कठोर परिश्रम घेतले तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात निश्चितपणे यश संपादन करता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक किशोर निर्मळ यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने वडाळा महादेव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर निर्मळ बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद चांगदेव पाटील पवार यांनी भूषवले होते. आजादी का अमृत महोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच कृष्णा पाटील पवार, उपसरपंच मंगलताई भोंडगे, उद्धवराव पवार डॉ.सादिक सय्यद उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात चांगदेव पाटील पवार यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची व्यासपीठे आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाने या व्यासपीठाचा वापर करून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करावे. त्यासाठी जीवनात विविध क्षेत्रातले अनुभव घ्या असे सांगितले. सरपंच कृष्णा पाटील पवार यांनी शिबिर कालावधीत केलेल्या विविध कामांचे उपक्रमांचे कौतुक करून असे उपक्रम समाज उपयोगी असतात असे सांगितले.
याप्रसंगी उत्तमराव पवार कैलास पवार अशोकराव गायकवाड दादासाहेब झिंज राजेंद्र हेबत पवार राजेंद्र भानुदास पवार सर्जेराव कासार मारथा राठोड विजय राऊत प्रशांत दर्शने रघुनाथ उघडे लक्ष्मणराव कनेरकर गणी अब्दुल पिंजारी राजेंद्र देसाई जयश्रीताई खेमनार राजेंद्र घोरपडे अरुंधती पवार भरत पवार विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र कळमकर प्रा.योगीराज चंद्रात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ.सादिक सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.विवेक मोरे यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ, सहकारी प्राध्यापक, कार्यालयीन सेवक, स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.