उक्कलगाव ( भरत थोरात ) : आजवर शाळेतून शिक्षणाऐवजी ' भाजी घ्या कांदे घ्या, मटकी भेळ, पापड घ्या ' असा आवाज घुमत होते. सर्वत्र सगळीकडे किलबिलाट सुरू होता. फक्त निमित्त होते. आनंद बाजार मेळाव्याचे.
तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भरविलेल्या आंनदी बाजार मेळाव्याने मुलांमध्ये चेहऱ्यावर नवचैतन्य पहावयास मिळत होते. बालगोपळामध्ये आनंदास उधाण आल्याचे चित्र निर्माण होते. मुलांना शिक्षणा बरोबर च व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे.त्यांना अर्थकारण समजावूनही व त्यातून आनंद मिळावा. यासाठी हाच आंनदीत उपक्रम राबविण्यात आला. मुलामुलींनी सकाळीच उपक्रमांची तयारी सुरू केलेली होती.आनंद मेळाव्या त विक्री करिता मटकी भेळ चना भेळ पापड वडे भजे पालेभाज्या कांदे बटाटे केबी फ्लॉवर इतर ही भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याबरोबरच संक्रातीसाठी विक्रीसाठी वाणही आणलेले होते. आपल्या वस्तू विक्रीकरिता मुलांचा किलबिलाट सुरू होता.
याप्रसंगी लोकनियुक्त संरपच नितिन थोरात ग्रामपंचायतीचे रविंद्र थोरात प्रकाश थोरात विजय पारखे, रमेश धनवटे तनुजा अभंग, डॉ.दत्तात्रय पावसे, केशव तावरे ज्ञानेश्वर तावरे आदिनाथ जगधने अशोक थोरात शालिनी भागवत रुपाली मोरे आश्विनी ताके नानासाहेब थोरात आदींनी या आंनद बाल मेळाव्याला भेट दिली.मुलांनी बनविलेल्या विविध वस्तुंचा आस्वाद घेतला असता कौतुकाची थाप दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुर्यभान वडितके, पुंजाहरी सुपेकर मारुती वाघ विनित चांदेकर कविता गायकवाड मनिषा धामणे ज्योती तोरणे त्यांनी इतर शिक्षकांनी सहकार्य केले.