श्रीरामपूर : अखिल भारतीय छावा संघटनेची नुकतीच नगर जिल्हा आढावा बैठकीत पार पडली. यावेळी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे होते. अखिल भारतीय छावा चे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, मराठवाडा विभाचे अध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील, संदीप ताडगे जिल्हाध्यक्ष जालना , राधेश्याम पवळ जिल्हाध्यक्ष जालना आदींच्या उपस्थीतीत ही बैठक पार पडली.
यावेळी नितीन पटारे म्हणाले संघटनेने सर्व राज्यातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या तलाठ्यांच्या कार्यालयात बेकायदेशीर बसलेला झिरो तलाठी हटाव आंदोलन नगर जिह्यात सुरू केले आहे. पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समक्ष भेटून निवेदन दिले असून नगर जिल्ह्यतील तलाठ्यांची चौकशी सुरू आहे. हे झीरो तलाठी बेकदेशीररित्या तलाठी ऑफिसमध्ये बसून शेकर्यांकडून पंचनाम्याचे 200 रु ,7/12उताऱ्याचे 100 ते150रु, नोंद लावण्याचे 500 ते 5000रु, वारस नोंदीचे प्रत्येक वारसाकडून 5000 ते 10000रु, खातेफोड करण्याचे 25000 ते35000 रु, कर्ज बोजा लावणे अथवा कमी करणे 500 ते 5000 रु, उत्पन्नाचा दाखल 500 रु, अशा प्रकारे लूट करीत असतात.
याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याधिकारी तसेच नाशिक विभागाचेआयुक्त यांनी तसे चौकशीचे आदेश दिले आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यात व्हावे यासाठी आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या उपसथितीत रणनिती आखण्यात आली. यावेळी मराठवाडा विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवकर्ण वाघ यांना नगर जिल्हा छावा च्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित सदस्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पंजाबराव म्हणाले की, नगर जिल्ह्यातील कामाबाबत मी समाधानी असून जिल्हाअध्यक्ष पटारेयांच्याअध्यक्षतेखाली सुरू झालेले झिरो तलाठी हटाव आंदोलन राज्यभर करणार असून संपूर्ण राज्यातीलशेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाराआहे. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या नावाला साजेस काम करून जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांना साथ द्यावी, मराठ्यांचे क्रांतिसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांचा विचार पुढे नेऊन समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकत द्यावी, यावेळी नगर दक्षिणचे कार्यधक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी प्रास्ताविक करताना संघटनेने आता राजकीय विचार करावा अशी सूचना मांडली. मराठवाडा अध्यक्ष देवक्रर्ण वाघ पाटील यांनी येथे बोलून सत्कार केल्याबद्द सर्वांचे धन्यवाद म्हणत नवीन कार्यकर्णीस शुभेच्छा दिल्या, तसेच प्रदेश संघटक अशोक चव्हाण यांनी जिह्यातील संघटनेच्या कामाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्या दिल्या, आभार जिल्हा मार्गदर्शक बहिरनाथ गोरे यांनी मानले.
यावेळी नितीन पटारे यांनी जाहीर केलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे - अविनाश उर्फ खंडू सातपुते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर नगर, नारायण उर्फ दादा बडाख पाटील जिल्हा शेतकरी आघाडी प्रमुख, अतुल जुंबड पाटील जिल्हा युवक आघाडी प्रमुख नगर दक्षिण, सुहास निर्मळ पाटील जिल्हा उपाध्यक्ष उत्तर नगर, प्रवीण देवकर जिल्हा उपाध्यक्ष उत्तर नगर, विजय बडाख तालुकाअध्यक्ष श्रीरामपूर, किरण उघडे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष श्रीरामपूर, रमेश म्हसे जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी आघाडी उत्तर नगर, महेश चव्हाण शहराध्यक्ष नगर, राहुल चिंध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, रवींद्र पठारे तालुकाध्यक्ष पारनेर, नितीन जंबे पाटील तालुकाउपाध्यक्ष पारनेर, उमेश नवघरे तालुकाध्यक्ष शेवगाव, अमोल वाळुंज तालुकाध्यक्ष राहुरी, प्रशांत पटारे तालुका उपाध्यक्ष श्रीरामपूर, कृष्णा घनवट जिल्हा सरचिटणीस नगर दक्षिण, शरद बोंबले जिल्हा सरचिटणीस उत्तर नगर, अनिल तळोले जिल्हा संपर्क प्रमुख उत्तर नगर, किशोर शिकारे जिल्हा संपर्क प्रमुख नगर दक्षिण, श्रीपाद जाधव कंत्राटदार आघाडी ता प्रमुख राहता, राजेंद्र भिंगारे तालुका संपर्क प्रमुख श्रीरामपूर, गाडगीलकर महेश सल्लागर पारनेर, गणेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष नगर दक्षिण,भाऊसाहेब वाडेकर तालुकाअध्यक्ष नगर, गणेश धुमाळ पाटील जिल्हा सचिव उत्तर नगर, शैलेश धुमाळ शहर अध्यक्ष श्रीरामपूर, परिमल दवांगे तालुकाध्यक्ष कोपरगाव, याना निवडी चे पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी एकलव्य चे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष मोरे यांनी वांगी ग्रामपंचयत बिनविरोध करत सदस्य झाल्याबद्दल छावा च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा शुभम गागरे,कार्तिक पवार,अकवर शेख,ओम घनवट,गडगीलकर राहुल,सुजित म्हस्के सुधीर कोकाटे,आदी सदस्य उपस्थित होते.