RBNB COLLEGE : बोरावके कॉलेजच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थी मैदानी सरावापासून वंचित..! संस्था कुणाच्या मालकीची नाही तर रयतेची आहे; आर बी एन बी कॉलेजचे मैदान खुले ठेवावे अन्यथा आंदोलन ; विद्रोही विद्यार्थी संघटना आक्रमक


श्रीरामपूर : शासनाच्या विविध भरती प्रकियेसाठी शारीरिक चाचणीची अट असते. स्पर्धा परीक्षांसाठी मैदानी सरावापासून विद्यार्थ्यांना वंचित न ठेवता सर्व विद्यार्थ्यांना आर बी एन बी कॉलेजचे मैदान खुले ठेवावे, अशी मागणी 'विद्रोही विद्यार्थी संघटने'च्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली. संस्था ही कुणाच्या मालकीची नाही तर आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. रयतेची आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेऊ, असा आक्रमक इशाराही यावेळी देण्यात आला.

रावबहादुर नारायण बोरावके महाविद्यालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रशासकीय नोकरी, विविध भरती जसे पोलीस, आर्मी ,नेव्ही, वन विभाग आदी अनेक भरतीसाठी   शारीरिक चाचणीची (मैदानी परीक्षेची) अट असते. मैदानी सरावासाठी सर्व विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध करावे.

याप्रसंगी अमोल सोनवणे यांनी म्हटले की,  तालुक्यातील प्रत्येक गरजू, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मैदानी सरावापासून वंचित ठेऊ नये. तुमच्या अटी-शर्ती आम्ही मानायला तयार आहोत. या अगोदर विद्यार्थ्यांना परवानगी होती. परंतु, व्यवस्थापक समितीने फक्त त्यांच्या महाविद्यालात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देतात. ज्यांना बोरावके महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही व त्यांनी जवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यांना महाविद्यालय परवानगी देत नाही. संस्था ही रयतेची आहे. आमची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही इथेच थांबणार नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी तालुका प्रमुख आकाश बांडे, आय्याज शेख, सोमनाथ मुळे, सुधीर ओहळ, समीर शेख, आकाश काळे, सद्दाम शेख, समीर शेख, जयदीप पठरे, रीहान पडघलमन, अदिती गायकवाड, गायत्री सावंत, कय्यूम पठाण, सुजाता मोरे, प्राजक्ता हाडके, हर्षदा माळी, भावना पाटील, मानसी वाडेकर, मानसी राजपूत, गायकवाड आदिती, अजय वायकर, आकाश उपळकर, पठाण आसिम गुलजार, विकास पोलादे, पवन धुलगंड, भारत धुळगंड,  ऋषीकेश बाचकर, अक्षय सोमवंशी, अतिष्य महांकाळ, विशाल नखंडे, अभिषेक तनपुरे, निखिल विधाते, प्राचखि देवकर, रोहित ठोकळ, ऋषिकेश वासे आदी विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post