बेलापूर महाविद्यालयाची कु. प्रणाली पाटील आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम


श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. प्रणाली पांडुरंग पाटील हिने न्यू, आर्ट्स ,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिला सात हजार रुपये रक्कम सन्मानपत्र व फिरता करंडक प्राप्त झाला आहे.

याचबरोबर गेवराई महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर येथिल अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शरद करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे.

तिच्या या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव ॲड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, खजिनदार हरिनारायण खटोड, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,भरत साळुंके विश्वस्त नारायणदास सिकची,सुरेश मुथा, श्रीकृष्ण भालेराव, प्रेमा मुथा, श्रीवल्लभ राठी ,रविंद्र खटोड , हरिश्चंद्रपाटील महाडिक, बापूसाहेब पुजारी, लीलावती डावरे , शेखर डावरे, राजेंद्र सिकची ,सुविद्या सोमाणी, ॲड.विजय साळुंके ,प्रा.हंबीरराव नाईक ,शिक्षक प्रतिनिधी प्रा.सुनिता ग्रोव्हर , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, वक्तृत्व समितीचे प्रमुख डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ अशोक माने, प्रा.निजाम शेख तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी , विद्यार्थी विद्यार्थीनी समस्त ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post