याबाबत हकीकत अशी की, टाकळीभान येथील ग्रामविकास अधिकारी श्री.जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांची मनमानी कारभार करण्याची पद्धत, कार्यालयात हजर न रहाणे, सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष करणे अशी ग्रामस्थांनी सरपंच व गावातील जेष्ठ पुढारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने गावातील दोन्ही गटांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. तसेच श्री.जाधव हे गावात गटा-तटाचे राजकारण करून गावात तेढ निर्माण करू पाहत असल्याचा आरोपही दोन्ही गटांच्या वतीने करण्यात आला आहे. आठ दिवसांच्या आत बदली न केल्यास कुठल्याही परिस्थितीत आंदोलनावर ठाम असल्याचे दोन्ही गटांचे म्हणणे होते. जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी सांगितले होते. त्याच अनुषंगाने मुरकुटे-विखे गटाच्या वतीने पंचायत समिती श्रीरामपूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर गुरुवारी (ता.२२) ठिय्या मांडला होता.
अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून गटविकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्याना संबोधित करताना सांगितले की, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण होताच चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. श्री.जाधव यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असे सांगून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली.
यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, माजी सभापती नानासाहेब पवार, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी व्हा.चेअरमन दत्तात्रय नाईक, ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे, यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, किशोर मैड, किशोर गाढे, अशोक कचे, रमेश धुमाळ, शंकर पवार, अविनाश लोखंडे, रमेश पटारे, दीपक पवार, संजय रणनवरे, दत्तात्रय मगर, रावसाहेब वाघुले, संजय पटारे, मल्हार रणनवरे, शिवाजी पवार, शिवाजी पटारे, भाऊसाहेब पटारे, भैय्या पठाण, बाळासाहेब आहेर, उत्तम पवार, विकास मगर, महेश लेलकर, अशोक लेलकर, संदीप कोकणे, मच्छिंद्र कोकणे, अनिल बोडखे, भागवत रणनवरे, सुभाष येवले, काकासाहेब रणनवरे, उत्तम रणनवरे, सिद्धार्थ बोडखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.