केंद्र सरकारकडून अन्न सुरक्षा कार्डधाकारंना रेशनवर कोरोना महामारी चालू झाल्यानंतर गेल्या ३ वषोपासून मोफत धान्य देण्यात येत होते. परिस्थितीनुरुप वेळोवेळी या योजनेला केंद्राकडून मुदत देण्यात येत होते. डिसेंबर २०२२ ला या मोफत धान्य योजनेची मुदत संपत असताना शुक्रवार, दि.२३ रोजी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेवून ही मोफत धान्य योजनेची मुदत एक वर्षाने वाढविली असून आता हे धान्य डिसेंबर २०२४ पर्यंत मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा ८० कोटी जनतेला लाभ होणार आहे. कोरोना महामारीमुळे गोरगरीब सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली होती. दिवसागणित वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला या मुदतवाढीने सामान्य नागरिकाला मोठा आधार मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षात धान्य वाटप करताना नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य नियोजन केल्यामुळे मोठी मदत झाली आहे. सरकारच्या निर्णयाचे हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, प्रदेश संघटक विजय जगताप, जिल्हाध्यक्ष मनोहर बागुल, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, शेतकरी महाआघाडी प्रमुख जी.एम.क्षिरसागर, राहुरी तालुकाध्यक्ष प्रसाद गाडे, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, शिवाजी फोफसे, अविनाश कनगरे, कोपरगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, राहाता संघटक दत्तात्रय मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष रामदास सदाफळ, बाळासाहेब जाधव, राजेंद्र पारधे आदींनी स्वागत केले आहे.