श्रीरामपूर शिवसेनेतर्फे दोन महिला वेटलिफ्टरचा जाहीर सत्कार


श्रीरामपूर : संभाजीनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रियांका श्रीराज पवार यांनी ८७ किलो वजनी गटात 53 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले आहे. याच स्पर्धेत भारती सतीश रासकर यांनीही ३५ वयोगटात ५३ किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्याबद्दल श्रीरामपूर शिवसेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना शहरप्रमुख सचिन बडदे, आम आदमी पार्टी जिल्हाप्रमुख तिलक डुंगरवाल, शिवसेना जिल्हा संघटक शारदाताई कदम, विस्तार प्रमुख रामपाल पांडे, ज्येष्ठ शिवसैनिक राधाकिसन बोरकर, उपशहर प्रमुख रोहित भोसले, श्रीराज पवार या दोघींना श्री साई फिटनेस क्लबचे संस्थापक तसेच बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश रासकर यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले आहे. 

या दोघींची निवड पुढील वाराणसी येथे १२ व १३फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व स्तरातून या दोघींचे सध्या अभिनंदन होत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post