श्रीरामपुरात वाहतुकीचा बोजवारा : शहरातील ट्राफिक सिग्नल सुरू करून वाहतुकीस शिस्त लावावी; हिंदू एकता आंदोलन पक्षाची मागणी


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात शासनाने महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल बसविले होते. मात्र, हे सिग्न गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने वाहतुकीत मोठ्या प्राणावर अडथळा निर्माण होत असून हे सिग्नल त्वरित सुरू करावेत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ वढाली आहे. रस्त्यावर गर्दी होवू नये व वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी शासनाने शिवाजी चौक, सय्यद बाबा चौक, गांधी पुतळा, बेलापूर रोडवरील सिद्धिविनायक मंदिर चौक या ठिकाणी ट्राफिक सिग्नल बसविले. काही दिवस हे सिग्नल चालू होते तोपर्यंत वाहतूक सुरळीत होत होती. वाहतुकीची कोंडी होवून गर्दी होत नसायची. महत्त्वाच्या चौकात एक पोलीस हवालदार उभे असायचे. वाहनधारकांना शिस्त लागली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे सिग्नलच बंद असल्याने वाहतुकीचा पुन्हा बोजवारा उडाला आहे. महत्त्वाच्या चौकांत गर्दी होत आहे, त्यामुळे काही ठिकाणी अपघातही झाले आहेत. वाहतुकीची शिस्त कोलडमली आहे. त्यामुळे शासनाने हे ट्राफिक सिग्नल पुन्हा सुरू करावे व पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, प्रदेश संघटक विजय जगताप, जिल्हाध्यक्ष मनोहर बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, शेतकरी महाआघाडीप्रमुख जी.एम.क्षीरसागर, राहुरी तालुकाध्यक्ष प्रसाद गाढे, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, शिवाजी फोफसे, अविनाश कनगरे, कोपरगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, राहाता संघटक, दत्तात्रय मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष रामदास सदाफळ, राहाता शहराध्यक्ष जयराम क्षीरसागर, गुरू भुसाळ, सोमनाथ जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष यादव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र पारधे आदींनी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post