बिडकीन बस स्थानकाच्या स्वच्छता व समस्याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या आदेशानुसार भीम गर्जना सामाजिक संघटनेने बस रोको आंदोलन केले. एसटी महामंडळाची संबंधित अधिकारी याकडे जाणून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी कारण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य सचिव इलीयास शेख, महाराष्ट्र सरचिटणीस अशोक गरुड, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज मिर्झा, जिल्हा प्रभारी राजूभाई शेख, संजय पवार, नीरजगाव अध्यक्ष रोहिदास जाधव, निलेश धडे, सलीम पठाण, हिरालाल हिवाळे, तब्येत पठाण, सलीम मिर्झा आदी उपस्थित होते. आंदोलन स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष जाधव, सहाय्यक फौजदार सोमनाथ तागडे, पोलीस कर्मचारी शिवानंद भंनगे, संजीवन कदम, भारत शेजुळ, विष्णू चव्हा, निलेश चौधरी, आदीसह मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.