श्रीरामपूर : नाऊर येथील प्राथमिक शाळेचे उपाध्यापक अनिल काळे यांची एमपीएससी परीक्षेमार्फत विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे (पुणे) जिल्हाध्यक्ष मीनाताई कुळकुंभे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्ष माणिक जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सदस्य नरेंद्र खरात होते. अनिल काळे हे राहाता येथील स्वस्त धान्य दुकानदार बापूसाहेब काळे यांचे ते चिरंजीव आहेत. याप्रसंगी संघटनेचे सदस्य शिवाजी सैद, प्रसिद्धीप्रमुख मंगेश छतवाणी, सी.बी.गायकवाड, राहुल म्हस्के, धनंजय झिरंगे, प्रशांत भागवत, संतोष वेताळ, नरेंद्र खरात, प्रताप पानसरे आदी उपस्थित होते.